अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या बिकीनी फोटोंचा सोशलवर ‘राडा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पप्पी दे पारूला या गाण्यामुळे घराघरात पोचलेली आणि बिग बॉस मराठी पहिल्या पर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री स्मिता गोंदकरने नुकतंच बिकीनी फोटोशुट केलं आहे. यातील काही काही फोटो स्मिताने सोशलवर शेअर केले आहेत सध्या हे फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत. स्मिता बिकीनी लुकमध्ये खूपच हॉट अँड बोल्ड दिसत आहे. स्मिताने आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना पु्न्हा एकदा घायाळ केलं आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अशा बोटावर मोजण्या इतक्याच अभिनेत्री आहेत ज्या बिकीनी लुकमध्ये फोटो शेअर करतात. याआधी नेहा पेंडसे, सई ताम्हणकर आणि राधिका आपटे या अभिनेत्री आपल्या हॉट बिकीनीलुकमुळे चर्चेत आल्या आहेत. यानंतर आता स्मिताचे फोटो धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

नुकताच स्मिताचा ये रे ये रे पैसा 2 हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर क्षोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार हे कलाकार आहेत. सिंगर मिक्का सिंगने यातील गाणं गायलं आहे. स्मिता आपल्या सिनेमामुळे नाही तर आपल्या हॉट लुकमुळे सध्या चर्चेचा हिस्सा बनली आहे.

स्मिात गोंदकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती राजू मिश्रा यांच्या लव्ह बेटींग या सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत चिराग पाटील, काजल शर्मा, सायली शिंदे, अनंद जोग, राजेश शृंगारपुरे, कमलेश सावंत, वैभव मांगले आणि अनिकेत केळकर हे कलाकारदेखील दिसणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like