Smoking-Drinking Alcohol | सिगारेट-दारू प्यायल्याने कमी होतात का दु:ख-वेदना अन् तणाव, वाढते काम करण्याची क्षमता; जाणून घ्या मनोचिकित्सकाकडून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Smoking-Drinking Alcohol | सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा इत्यादीला जाहिराती किंवा चित्रपटांतून अनेकदा ग्लोरिफाय केले जाते. तसेच त्रस्त व्यक्ती या गोष्ट सेवन केल्यानंतर जास्त प्रॉडक्टिव्ह, धाडसी होतो आणि आपल्या समस्या पटकन सोडवतो असे दाखवले जाते. काहींचा गैरसमज असतो की, अशा व्यसनांमुळे दु:ख, वेदना आणि तणाव (Smoking-Drinking Alcohol) कमी होतो. पण खरोखर असे होते का? जाणून घेवूयात तज्ज्ञांकडून…

 

याबाबत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ सायकेट्रीचे प्रोफेसर डॉ. नंद कुमार (Dr. Nand Kumar) सांगतात की, चित्रपट, जाहिरातीमधून चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. येथूनच नशा आणि इतर गोष्टींचा फॉलोअप सुरू होतो. नशेमुळे दु:ख कमी होईल की वाढेल हे नशेच्या परिणामावर अवलंबून आहे.

 

अल्कोहल किंवा दारूचा (Smoking-Drinking Alcohol) होतो हा परिणाम…

 

जेव्हा व्यक्ती त्रस्त होतो तेवहा त्याचा ब्रेन खुप सतर्क असतो. त्यावेळी तो ओव्हर अ‍ॅक्टिव्ह सुद्धा होतो. रेस्टलेस वाटते आणि त्याची एंग्झाएटी वाढते. कारण या गोष्टी नैसर्गिक असतात. अशावेळी जर व्यक्ती या कालावधीत नैसर्गिक पद्धतीने राहात असेल तर या समस्या हळुहळु कमी होतात आणि ब्रेन आपोआप मॉडरेट करतो. परंतु जर त्या स्थितीत व्यक्तीने अल्कोहल किंवा दारू घेतली तर ती ब्रेनला किंवा ब्रेनच्या नसांना डिप्रेस करते. अशावेळी कॉन्शसनेस किंवा चेतना स्तर खुप कमी होतो. त्या स्थितीत भावनांचा गोंधळ थांबतो. त्याचा परिणाम हा होतो की, व्यक्ती जुन्या स्थितीतून बाहेर पडते. तिच्या वेदना किंवा दु:ख खुप कमी होते आणि व्यक्तीला आराम मिळतो किंवा चांगले वाटते.

 

अल्कोहालचे व्यसन (Smoking-Drinking Alcohol) लागल्यानंतरची स्थिती

 

डॉ. नंद कुमार सांगतात की, अल्कोहल घेतल्यानंतर दु:ख-वेदनांमध्ये तात्काळ आराम मिळतो.
परंतु जसजसा अल्कोहलचा परिणाम कमी होतो समस्या पुन्हा वाढण्यास सुरूवात होते.
यानंतर व्यक्ती सतत दारूचे सेवन करण्यास सुरूवात करतो आणि दारूच्या परिणामाची शरीराला व्यसन लागते, तेव्हा त्याचे प्रमाण सतत वाढत जाते.
यानंतर व्यक्तीच्या शरीरावर न्यूरोटॉक्सिक इफेक्ट होऊ लागतो. आणि दारू शरीरातील नसांचे नुकसान करू लागते.
यामुळे व्यक्तीला पहिल्यापेक्षा जास्त अस्वस्थता आणि वेदना जाणवतात.
खुप जास्त दारू घेतल्यानंतर व्यक्तीचे स्वतावर नियंत्रण राहात नाही आणि नॅचरल सोशल इमिटेशन नष्ट होते.
अशावेळी जेव्हा तो कुणाशीही बोलतो तेव्हा खुलेपणाने बोलतो.
जे त्याच्या मनात असते ते जवळपास सर्व बाहेर येते परंतु या गोष्टी दारूची नशा उतरल्यानंतर अनेक समस्या निर्माण करतात.

 

यामुळे व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर खुप परिणाम होतो.
तुम्ही पाहिले असेल की एखादे खुप धाडसी किंवा वाईट काम करायचे असेल तर लोक अल्कोहल घेतात.
हे यासाठी की त्यांची निर्णय घेणे, चांगले-वाईट समजण्याची क्षमता कमजोर पडते आणि ते हे काम करतात.

 

सिगारेटचा होतो हा परिणाम

 

डॉ. कुमार सांगतात, जेव्हा व्यक्ती निकोटिन घेतो तेव्हा तो ब्रेनला एस्क्यूमिलेट करतो. म्हणजे जास्त सतर्क किंवा सक्रिय करतो.
मात्र, ब्रेनची ही सक्रियता सुद्धा अस्थाई आहे. अशावेळी जेव्हा याचा परिणाम कमी होतो.
तेव्हा पुन्हा मेंदू पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त सुन्न स्थितीत पोहचतो.
याच कारणामुळे व्यक्ती थोडी समस्या आली तरी सतत सिगारेट ओढते.

 

Web Title : Smoking-Drinking Alcohol | aiims psychiatrist says smoking and drinking alcohol can decrease pain and stress but the effects are adverse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | सहकारनगरमध्ये सजली हिंदी-मराठी गाण्यांची मैफल; आधार सेवा केंद्राकडून आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम

NCRB Data | धक्कादायक ! ‘एनसीआरबी’च्या अहवालातून समोर आले तथ्य, 2020 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा जास्त व्यापार्‍यांनी केल्या आत्महत्या

Satara News | खा. उदयनराजे पोहोचले श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या भेटीला; दीड तास चर्चा