Smoking Reduces Life Expectancy And Causes Cancer | सावधान ! तुमच्या ‘या’ एका सवयीमुळे आयुष्य 10 वर्षांनी होतंय कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Smoking Reduces Life Expectancy And Causes Cancer | तंबाखूमध्ये निकोटीनसहीत (Nicotine) इतर ६० रासायनिक पदार्थ असतात. त्यांच्या नित्य सेवनाने कर्करोगासह (Cancer) इतर अनेक घातक रोग होऊ शकतात. एवढेच नव्हे धूम्रपान (Smoking) केल्याने तुमचे आयुष्यमान कमी होऊ (Smoking Reduces Life Expectancy And Causes Cancer) शकते.

 

धुम्रपान करणारा व्यक्ती हा एकाद्या निरोगी व्यक्तीपेक्षा १० वर्षे कमी जगतो, असा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आकडेवारीरून समोर आला आहे.

 

नियमित धूम्रपान केल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या (Health Problems) उद्भवतात. यामुळे अकाली मृत्यूही येतो. दररोज धूम्रपान करणे म्हणजे कर्करोग, फुफ्फुसांच्या आजारांना (Lung Disease) निमंत्रण देण्यासारखे आहे. या एका सवयीपासून आपण सुटका करून घेतली तर अकाली मृत्यूचा धोका (Risk Of Death) तर कमी होऊ शकतोच, शिवाय आयुष्य वाढण्यास मदत होते.

 

धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान (Lung Damage Caused By Smoking) –
इतर कोणत्याही प्रकारच्या कर्करोगापेक्षा फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे (Lung Cancer) मृत्यू (Death) होणार्‍यांची संख्या अधिक आहे. एका जागतिक अध्ययनावरून फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुमारे ९०% उदाहरणांमध्ये नियमित धूम्रपान करणारे आढळून आले आहेत. फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पाच वर्षांत पाचपैकी फक्त एक रुग्ण जिवंत राहिला आहे.

फुफ्फुसांच्या समस्या टाळा (Prevent Lung Problems) –
गेल्या दशकात क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) चे रुग्ण वेगाने पुढे आली आहेत. यासाठीही नियमित धूम्रपान हेच प्रमुख कारण आढळले आहे. सीओपीडी (COPD) हा फुफ्फुसासाठी धोकादायक आजार (Lung Disease) आहे. यात श्वास घेणे कठीण होते. यामुळे दीर्घकालीन अपंगत्व येण्याचे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. सीओपीडी या आजारात सुमारे ८५ ते ९०% रुग्ण ही नियमित सिगारेट (Cigarette) ओढणारी आहेत. अमेरिकेत आजारांमुळे मृत्यू होण्यात हा आजार चौथे प्रमुख कारण मानला गेला आहे.

 

हृदयविकाराचीही शक्यता (Possibility Of Heart Attack) –
धूम्रपान केल्याने आपल्या हृदयासह (Heart) आपल्या शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाचे नुकसान होते.
धूम्रपान केल्याने आपल्या रक्तवाहिन्या (Blood Vessels) आकुंचन पावतात आणि रक्त पुरवठ्यात (Blood Supply) अडथळे येतात.
त्यामुळे हृदयामध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा (Oxygen) पुरवठा कमी होतो. या अवस्थेमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो.
यासाठी धूम्रपान सोडणे हाच एक महत्वाचा उपाय तज्ज्ञांनी सांगितला आहे.

 

Web Title :- Smoking Reduces Life Expectancy And Causes Cancer | smoking reduces life expectancy and causes cancer avoiding smoking benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

 

Pune Crime | दीड हजार रुपये परत न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून; डेंगळे पुलाखालील नदीपात्रातील घटना, शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

 

Maharashtra Assembly Speaker Election | राज्यपाल विरुद्ध ‘मविआ’ संघर्ष वाढणार?, ठाकरे सरकारचा ‘हा’ प्रस्ताव फेटाळला