स्मृती मानधना ठरली आयसीसीच्या नंबर एकची खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर स्मृती मंधना आयसीसीच्या वनडे रेँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर येऊन पोहंचली आहे. आज झालेल्या न्यूजीलँड विरोधी सामन्यामध्ये १९६ धाव काढल्या आहेत.

स्मृती मंधना हीने न्यूजीलँड विरोधात झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय खेळा मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. दरम्यान आज ( २ फेब्रुवारी ) शनिवारी सुरु असलेल्या आयसीसीच्या एकदिवसीय खेळामध्ये तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येऊन जगातील पहिल्या क्रमांकाची फलंदाज ठरली आहे.

स्मृती मंधनाने न्यूजीलँड विरोधात सुरु असलेल्या सामन्यामध्ये १९६ धाव काढल्या आहेत. त्यामुळे ७५१ सरासरीने वनडे रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर येऊन पोहंचली आहे.

विशेष म्हणजे, स्मृती मंधना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याची रहिवाशी आहे, इतकेच नव्हे तर, सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली होती. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आयसीसीने याची घोषणा केली होती. स्मृती मंधनाची आयसीसीच्या वर्षाच्या सर्वोत्तम वनडे आणि टी-२० टीममध्येही निवड करण्यात आली आहे.

स्मृती मंधनाने २०१८ यावर्षी १२ वनडे मॅचमध्ये ६७ च्या सरासरीने ६६९ रन आणि २५ टी-२० मॅचमध्ये तिने १३०च्या स्ट्राईक रेटने ६२२ रन केले होते. स्मृतीने महिला टी-२० वर्ल्ड कपमध्येही चमकदार कामगिरी केली होती. इतकेच नव्हे तर वर्ल्ड कपच्या ५ मॅचमध्ये १२५.३५ च्या सरासरीने १७८ रन केले. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती.