Video : ‘या’ प्रश्नावर सभेतील नागरिकांनी दिलेल्या उत्तराने स्मृती इराणी ‘बुचकळ्यात’

भोपाळ : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचार सभेत थेट शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्याने त्यांचे हस्से झाल्याचा अनुभव आला होता. पण, त्यातून शहाणे न होता स्मृती इराणी यांनी पुन्हा असाच प्रश्न विचारला. पण, हा प्रश्न यांनी मध्य प्रदेशमध्ये विचारल्याने शेतकऱ्यांच्या उत्तराने त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

अमेठी येथील मतदान पार पडल्यानंतर आता स्मृती इराणी वेगवेगळ्या मतदार संघात प्रचार करीत आहेत. भोपाळपासून सुमारे २०० किलोमीटर दूर असलेल्या अशोकनगरमध्ये त्या एका प्रचार सभेत बोलत होत्या. त्यावेळी भाषण करताना त्यांनी थेट उपस्थितींना विचारले की, राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा वादा केला होता. कर्जमाफी झाली का?. त्यांना अपेक्षा होती की लोक नाही नाही म्हणतील. पण, झाले उलटेच. गर्दीतून लोकांनी हो हो असे ओरडून सांगितले.

त्यानंतर स्मृती इराणी यांनी आपले भाषण लगेचच आवरते घेतले. यासंबंधीचा व्हिडिओ मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विटर शेअर केला आहे. त्यावर लिहिले आहे की, आता जनताच खोट्या बातांना थेट उत्तर देऊ लागली आहे.