हातात ‘तलवारी’ घेवुन ‘डान्स’ करताना दिसल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा खासदार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी या शुक्रवारी गुजरातमधील एका कार्यक्रमात वेगळ्या स्टाईलमध्ये दिसल्या. भावनगर येथील स्वामीनारायण गुरुकुल मूर्ती प्रतिष्ठान महोत्सवात स्मृती इराणी यांनी मुलांसमवेत तलवार नृत्य सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती यांनी दोन्ही हातात तलवार घेऊन आपले कौशल्य दर्शविले. तलवारसोबत स्मृती इराणी यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, भावनगर येथील स्वामीनारायण गुरुकुल मूर्ती प्रतिष्ठान महोत्सवात मुले पारंपारिक कार्यक्रम सादर करत होती. कार्यक्रमादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या मुलींनी ‘तलवार रास’ नावाच्या पारंपारिक नृत्यादरम्यान स्मृती इराणी यांना यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. यानंतर स्मृती इराणी स्टेजवर पोहोचल्या आणि त्या मुलींसोबत सहभागी झाल्या. ‘तलवार रास’ हा गुजरात आणि राजस्थानमधील लोकप्रिय नृत्य आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी मुलींसोबत रंगमंचावर दिसत आहे. नृत्यादरम्यान स्टेजवर मुली ज्या पद्धतीने नृत्य सादर करतात. स्मृती इराणी त्या मुलींना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी दोन्ही हातात तलवारीने कौशल्य दाखवत आहेत. या कार्यक्रमाला प्रदेश भाजपा अध्यक्ष जितू वाघाणी देखील उपस्थित होते.

स्मृती इराणी यांचा तलवार डान्स अशा प्रकारे पाहिल्यानंतर हा व्हिडिओ ट्विटरवर जास्त प्रमाणात शेअर केला जात आहे. सेहानाने हा व्हिडिओ ट्विट करुन लिहले की, ‘फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है.’

 

Visit : Policenama.com