स्मृती इराणी आणि अरविंद केजरीवाल यांची मुलं १२ वी पास ; पहा किती मिळाले गुण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १२ वीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर केला. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहरने १२ ची परीक्षा पास केली असून त्याला ९४ टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर स्मृती इराणी यांनी आपला हा आनंद ट्विटवर ट्विट करून शेअर केला आहे.

काय आहे स्मृती इराणी यांचे ट्विट

स्मृती इराणी यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. “माझा मुलगा चांगले गुण घेऊन बारावीची परीक्षा पास झाल्याचा आनंद होत आहे. जोहरवर मला गर्व आहे. प्रमुख चार विषयांमध्ये त्याला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. अर्थशास्त्रमध्ये ९४ गुण घेतल्याचा जास्त आनंद होतोय, त्याचा मला जास्त आनंद होतोय. मला माफ करा पण आज मी फक्त आई आहे”. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

याबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित यानेही यंदा १२ ची परीक्षा पास केली असून त्याला ९६. ४ टक्के गुण मिळले आहेत.
याबाबतचे ट्विट केजरीवाल यांची पत्नी सुचिता केजरीवाल यांनी केले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की , ” देवाच्या आशिर्वादाने आणि हितचिंतकांच्या शुभेच्छांमुळे माझ्या मुलाला १२ वी परीक्षेत ९६. ४ गुण मिळाले आहेत.”

या संकेतस्थळावर पहा निकाल

सीबीएसई १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यंदाचा निकाला ८३.४ टक्के लागला आहे. १५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान १२ वीची परीक्षा झाली होती. cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like