केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केलं ‘थप्पड’चं कौतुक, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी थप्पड या सिनेमाचं कौतुक केलं आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की, कोणत्याही महिलेवर हात उचलणं योग्य नाही, मग ती एक चपराक का असेना. रविवारी स्मृती इराणी इंस्टाग्रामवरून सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. अनुभव सिन्हा यांनी थप्पड सिनेमा डायरेक्ट केला आहे.

थप्पडचा ट्रेलर शेअर करताना स्मृती इराणी म्हणतात, “किती जणांनी ऐकलं असेल की अॅडस्ट करावं लागतं, कितीजणांनी विचार केला असेल गरिब महिलांचे पतीच मारहाण करतात, कितीजणांनी मानलं असेल की, साक्षर माणूस कधीच हात उचलत नाही. किती जणांनी आपल्या मुली, सूना यांना म्हटलं असेल की, एवढं काही नाही मुली असं तर आमच्यासोबतही झालं आहे. परंतु पहा आज किती खुश आहेत.”

पुढे त्या म्हणतात, “भलेही मी डायरेक्टरच्या राजकीय विचारधारेशी सहमत नाही असू शकत किंवा काही मुद्द्यांवरून काही कलाकारांसोबत असहमत असेल परंतु ही कथा मी नक्कीच पाहणार. मी अशी अपेक्षा करते की, लोकंही त्यांच्या कुटुंबासोबत हा सिनेमा पाहतील. महिलेवर हात उचलणं योग्य नाही. एक चपराकसुद्धा नाही. एकही नाही.”