स्मृती इराणी यांनी शेयर केला मुलासोबतचा ‘जुना’ फोटो, एकता कपूरनं केली ‘ही’ कमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासदार स्मृती इराणी र खुप अ‍ॅक्टिव्ह असतात. या ठिकाणी त्या कुटुंबासोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फोटो शेयर करत असतात. स्मृती यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचा एक जुना फोटो शेयर केला आहे. फोटो पाहिल्यावर समजते की, आई आणि मुलाने रंग खेळल्यावर हा फोटो काढला आहे.

या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. स्मृती यांनी कॅपशनमध्ये लिहिले – मेरे सबसे प्रिय, मैं तुमसे बहुत प्यार करती हूं. स्मृतीने यांनी फोटोसाबत आणखी एक फोटो शयर केला आहे. त्यांनी एका ग्रीटिंग कार्डचा फोटो शेयर केला आहे. हे कार्ड खुप जुने असल्याचे दिसते आणि त्यांच्या मुलानेच त्यांना दिले आहे. कार्डवर लिहिले आहे – I love you यासोबतच ग्रीटिंगवर एक एक झोपडी दाखवली आहे.

सोशल मीडियावर आई आणि मुलांच्या या प्रेमाला खुप पसंती मिळाली. या जुन्या फोटोत दिसणार्‍या आणि जोहरने बनवलेल्या ग्रीटिंगचे लोकांनी खुप कौतूक केले आहे. स्मृती इराणी यांची मैत्रिण एकता कपूरने सुद्धा फोटोवर कमेंट केली आहे. तिने लिहिले आहे – लव हिम. एकता कपूर आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये खुप चांगले संबंध आहेत. स्मृतीसुद्धा एकता सोबतचे अनेक फोटो शेयर करत असतात. काही काळापूर्वी सरकारने एकता कपूरचा पद्मश्रीने गौरव करण्याची घोषणा केली आहे.