‘देशहितासाठी नव्हे, कुटुंबासाठी देशाची फाळणी’ : स्मृती ईराणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘इंग्रजांनी भारताचे विभाजन केले आणि काँग्रेसनेच त्यांना आपले आदर्श बनवले. काँग्रेसला त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान व्हायचे होते, म्हणून काँग्रेस पक्षाने देशाची फाळणी करण्याला सहमती दर्शवली. त्यामुळे देशाची फाळणी ही देश हितासाठी नव्हे तर कुटुंबासाठी करण्यात आली होती, अशी जहरी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. वाराणसी येथे नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित सभेत स्मृती ईराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.

स्मुती पुढे म्हणाल्या कि, पाकिस्तानच्या इशाऱ्यावर १९ जानेवारी १९९० ला जम्मू-काश्मीरमधील पंडिताना काढण्याचे काम करण्यात आले. तो दिवस इतिहासातील काळा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बापूच्या आवाजाला स्वीकारले. भारतातील जनतेने जगाला जे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच नागरिकत्व संशोधन कायद्यासाठी जनतेने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांना आशीर्वाद दिले असल्याचे स्मृती इराणी यांनी यावेळी म्हंटले आहे.

तसेच पाकिस्तानात ज्यावेळी मुलींवर बलात्कार झाला, त्यांचे जबरदस्तीने लग्न करण्यात आले, त्यावेळी काँग्रेसने एक शब्दही काढला नाही. पाकिस्तानात ईसाईंच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी यांना रडू आले नाही. मात्र, बाटला हाऊस कांडावर मात्र त्यांना अश्रू अनावर झाले, अश्या शब्दात स्मृती ईराणी यांनी पाकिस्तान आणि काँग्रेसवर टीका केली. सोबतच मुलीच्या हक्कासाठी नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कायद्याचे स्मृती यांनी स्वागत करत पंतप्रधानांचे आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/