Smriti Irani To Sonia Gandhi | महिला आरक्षणाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस-भाजपामध्ये जुंपली, स्मृती इराणींचे सोनिया गांधीना प्रत्युत्तर

नवी दिल्ली : Smriti Irani To Sonia Gandhi | महिला आरक्षण विधेयकावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांनी हे विधेयक माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते, त्यांनी हे विधेयक आणले होते. सरकारने हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे, असे म्हटले. यावर आता भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, काँग्रेसच्या विधेयकात कोणत्या त्रुटी होत्या, मोदींचे विधेयक कसे चांगले हे सभागृहात सांगितले. तसेच काँग्रेसने श्रेय घेण्याच्या प्रकारावर जोरदार टीका केली. (Smriti Irani To Sonia Gandhi)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयक सादर होणे ही देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हाही महिलांची आरक्षणाची मागणी होती. आज काही महानुभवांनी अटलबिहारी वाजपेयी आणि देवेगौडा यांचीही नावे घेतली. मी त्यांचे अभिनंदन करते. तसेच राजनाथ सिंह यांच्या समितीत माझ्यासह सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, नजमा हेपतुल्ला होत्या. मी या सगळ्यांचे अभिनंदन करते. (Smriti Irani To Sonia Gandhi)

काँग्रेसवर हल्लाबोल करताना स्मृती इराणी म्हणाल्या, यशाचे अनेक बाप असतात, अपयशाला कुणीही विचारत नाही अशी म्हण आहे. त्यालाच अनुसरुन मी सांगते की, विधेयक संसदेत आणले तेव्हा काही लोक म्हणाले, हे आमचेच विधेयक आहे. काही म्हणाले, आम्ही चिठ्ठी लिहिली. काहीजणांनी म्हटले, या विधेयकाचा संवैधानिक मसुदा आमचा आहे. (Smriti Irani To Sonia Gandhi)

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, आज सभागृहातल्या एक सन्मानीय नेत्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यांचे मी विशेष आभार मानते. कारण आत्तापर्यंत आम्हाला हे सांगितले गेले की एका कुटुंबाने ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती केली. मात्र आज त्यांनी हे मान्य केले की ही घटनादुरुस्ती नरसिंह राव सरकारने केली.

दुसरी मागणी ते करत आहेत की त्वरित अमलबजावणी का करत नाही. मी आज ती प्रत आणली आहे ज्याला ते आमचे बिल म्हणतात. काँग्रेस पक्ष म्हणतो की हे बिल राज्यसभेत पास झाले आणि मग लोकसभेत टिकले नाही.

युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या बिलाच्या ३ बी मध्ये म्हणतात की शेड्युल कास्ट, शेड्युल टड्ढाईबसाठी तिसऱ्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये जागा राखीव नसतील. आमच्या मोदी सरकारची गॅरंटी आहे की, जेव्हा हा कायदा येईल तेव्हा १५ वर्षे महिलांना आरक्षण मिळेल. मात्र काँग्रेसच्या २ बी आणि ३ बी मध्ये पंधरा वर्षांची तरतूद नाही.

दहा वर्षे महिलांनी मेहनत करायची. मात्र त्यानंतर तुमचा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेऊ हे त्या प्रस्तावात होते.
आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करते. ज्यांनी काँग्रेसची ही इच्छा धुळीस मिळवली.
काँग्रेसचे आता हे म्हणणे आहे की त्वरित आरक्षण का देत नाही? घटनेची हेटाळणी करणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे.
मात्र संविधानाचे अनुच्छेद ८२ वाचले तर त्यात म्हटलेय की जनगणना झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात.
विरोधी पक्षांना घटनेचा अपमान करायचा आहे का? असा सवाल स्मृती इराणी यांनी विचारला.

स्मृती इराणी म्हणाल्या, आता काहीजण विचारतात की तुम्ही ओबीसी आणि मुस्लिमांना आरक्षण का देत नाही?
माझ्यापेक्षा अनुभवी लोक जे माईकशिवाय आणि कुठल्याही संमती शिवाय दातओठ खाऊन बोलत आहेत
त्यांना बहुदा हे माहित नाही की संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण दिलेच जात नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल