‘कोरोनामुळे 3 महिन्यात देशभरातील 577 मुलं झाली अनाथ’

मुंबई, ता. २४ : पोलीसनामा ऑनलाइन : “१ एप्रिल ते आज दुपारी २ वाजेपर्यंत, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार ५७७ मुलांनी आपल्या पालकांना करोनामुळे गमावल्याची माहिती दिली आहे. भारत सरकार कोरोनामुळे आपले दोन्ही पालक गमावलेल्या असहाय्य मुलांना पाठिंबा आणि संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. ” असं महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

 

 

 

कोरोनामुळे आई आणि वडील दोघांनाही गमावलेल्या प्रत्येक असहाय्य मुलाला पाठिंबा तसंच संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. देशभरात गेल्या तीन महिन्यात कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर ५७७ मुलं अनाथ झाली. त्यांच्या डोक्यावरील पालकांचं छत्र हरवलं आहे. महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली आहे. ही १ एप्रिलपासूनची आकडेवारी असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर अशा मुलांना समुपदेशन हवं असेल तर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (NIMHANS) त्यासाठी तयार आहे. या मुलांना वाऱ्यावर सोडलं जात नसून जिल्हा प्रशासनाच्या अख्त्यारित सुरक्षा दिली जात असून लक्ष ठेवलं जात आहे. दरम्यान, या मुलांची देखभाल करण्यासाठी निधी कमी नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्रालय कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची माहिती मागत असतानाही अनाथ मुलांबद्दल चर्चा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून ती मिळत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. “मुलांसंबंधी केंद्र सरकार सतत राज्यं आणि जिल्ह्यांसोबत संपर्कात आहे. त्यांच्या कल्याणासाठी निधीची अजिबात कमतरता नाही. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची सर्व भागधारकांसोबत बैठक पार पडली आहे. यामध्ये युनिसेफचाही समावेश आहे,”