केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांनी बुधवारी संध्याकाळी ट्विट करुन ही माहिती शेअर केली. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केले की, असे कधीतरीच होते की एखादी घोषणा करताना मला शब्द शोधावे लागतात. मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी चाचणी करुन घ्यावी अशी विनंती करते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा त्यांनी बिहारचा दौरा केला होता त्यावेळी स्मृती इराणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. स्मृती इराणी यांनी मंगळवारी गोपाळगंजमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी आरजेडीवर जोरदार निशाणा साधला.

You might also like