हिना खाननं केलं स्मृती इराणींचं ‘कौतुक’, मिळाली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन ! दोघींची बातचित सोशलवर व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : टीव्हीची क्वीन एकता कपूर हिच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तिला विश करण्यासाठी खास व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओवर हिना खान हिनंही कमेंट केली होती. हिनानं स्मृती यांना इंस्पिरेशनल म्हटलं ज्याचं उत्तर देताना एकतानं त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

स्मृती इराणी-हिना खानची बातचित व्हायरल
स्मृती इराणी आणि हिना खान यांच्यात झालेल्या चिटचॅटची सोशलवर खूप चर्चा होत आहे. सर्वात आधी इराणींच्या व्हिडीओर कमेंट करत हिना म्हणाली, हा व्हिडीओ खूप स्वीट आहे. स्मृती तुम्ही त्या काळातील एकमेव अ‍ॅक्ट्रेस आहात ज्या माझ्या फेवरेट होत्या. गेल्या 11 वर्षांपासून मी प्रत्येक मुलाखतीत तुमचा उल्लेख करत असते. तुम्ही स्क्रीनवर मॅजिकल होत्या. एकता कपूरला माहिती आहे की, मी तुमचा किती सन्मान करते.”

हिना खानला प्रत्युत्तर देत स्मृती इराणी म्हणाल्या, “हिना थँक्यु. या शब्दांसाठी मी तुझी आभारी आहे. आशा आहे की, लवकरच तुम्हाला भेटेल.” स्मृती यांनी तयार केलेल्या या व्हिडीओवर अनेक सेलेब्सनंही कमेटं केल्या आहेत. एकता कपूर आणि स्मृती इराणी यांची चांगली मैत्री आहे. एकता कपूरचा मुलगा रवी सोबतही स्मृती इराणी यांची चांगली बाँडिंग आहे.