निवडणुकीच्या तोंडावरच स्मृती इराणींना मोठा झटका ; निकटवर्तीयाची काँग्रेस सोबत हातमिळवणी

अमेठी : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला आहे. अमेठी लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय रवी दत्त मिश्रा यांनी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली आहे. रवी दत्त मिश्रा हे समाजवादी पक्षाचे मंत्री होते. आणि सध्या ते भाजपचे नेते आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालेले आहे, यादरम्यान अमेठी लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय रवी दत्त मिश्रा यांनी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली आहे. अमेठीमध्ये काँग्रेसतर्फे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी प्रियांका गांधी अमेठीमध्ये आले असता त्यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाचे मंत्री, भाजपचे नेते रवी दत्त मिश्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विशेष म्हणजे, स्मृती इराणींच्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मिश्रा यांच्यावर होती मात्र निवडणुकीच्या तोंडावरच त्यांची काँग्रेसशी हात मिळवणी केल्याने स्मृती इराणींना हा मोठा धक्का मानल्या जात आहे.