मानधनानं पुरुष-महिला क्रिकेटच्या ‘सॅलरी’मधील फरकाबाबत केलं ‘मन’ मोकळं, जिंकली सर्वांची मनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच महिला क्रिकेट टीमची फलंदाज स्मृति मानधनाला आयसीसी तर्फे वर्षांसातील उत्तम कामगिरी करणारी महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त बीसीसीआयकडून बीसीसीसीआय कडून महिला आणि पुरुष खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या वेतनात तफावत आहे हा विषय चर्चेसासाठी घेण्यात आला होता. मानधना ने पुरुष आणि महिला खेळाडूच्या वेतन असमानतेचा विषय काढून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.

याबाबत बोलताना मानधना म्हणते, आपल्याला समजून घ्यावे लागेल की जेवढी पण कमाई होते ती पुरुष क्रिकेट मधून होते, ज्या दिवशी महिला क्रिकेट मधून देखील कमाई होईल त्या दिवशी सर्वात आधी मी म्हणेल की, आम्हाला देखील त्यांच्याप्रमाणे समान वेतन दिले जावे परंतु सध्या आम्ही तसे म्हणू शकत नाही असे मानधना ने स्पष्ट केले.

23 वर्षीय ही महिला खेळाडू पुरुष क्रिकेटच्या कमाई आणि संरचनेबद्दलही बोलली पुरुष क्रिकेटपटूंना बीसीसीआयने दिलेल्या वार्षिक केंद्रीय कराराअंतर्गत जास्तीत जास्त 7 कोटी रुपये तर महिला क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त 50 लाख पगार मिळत आहेत.

मानधना म्हणाली, मला नाही वाटत की आमची कोणतीही सहकारी खेळाडू याबाबत विचार करत असेल कारण याक्षणी आपले लक्ष देशासाठी सामना जिंकण्यावर आहे जेणेकरून लोक सामना पहायला येतील कमाई वाढेल आणि जर हे शक्य झाले तर पुढील गोष्टी देखील आपोआप होतील असे मानधना म्हणते.
तसेच यासाठी आम्हाला परफॉर्म करावे लागेल, आम्हाला समान वेतनाची गरज आहे हे म्हणणे आत्ताच बरोबर ठरणार नाही यामुळे मी याबाबत काहीही भाष्य करू इच्छित नसल्याचे देखील मानधनाने सांगितले.

महिला क्रिकेट खेळाडूंना आता ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका आणि त्यानंतर टी 20 चा वल्डकप खेळावा लागणार आहे. त्यामुळे ही तिरंगी मालिका वल्डकपची तयारी असल्याचे मानधनाला वाटत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –