काश्मीरमध्ये एका दिवसानंतरच SMS सेवा बंद, 72 दिवसानंतर सुरू झाली होती पोस्टपेडची सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये आज एका दिवसानंतर पुन्हा एकदा एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. परंतू पोस्टपेड सेवा मात्र सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये मोबाइल सेवा 5 ऑगस्टपासून 14 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात आली होती. यात पोस्टपेड मोबाइल सेवा सुरु करण्यात आली होती, प्रीपेड सेवा आणि इंटरनेट अजूनही बंद आहे. राज्यात पर्यटनावरुन बंदी हटवण्यात आली आहे. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरचा विशेष राज्याच्या दर्जा रद्द करण्यात आला होता. राज्य दोन केंद्रशासित प्रदेशात वाटण्यात आले. कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर संचार सेवा पूर्णता बंद करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की संध्याकाळी 5 वाजता एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे, सोमवारी रात्री 8 वाजता दोन दहशतवाद्यांनी राजस्थानच्या एका ट्रक ड्रायव्हरला गोळी मारुन त्याची हत्या केली होती, तसेच एका मळ्याच्या मालकावर देखील हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शरीफ खान असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यात एक दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी नागरिक देखील सहभागी आहे. दहशतवादी हल्ला शीरमल या गावात झाला कारण काश्मीर खोऱ्यातून फळांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की 25 लाखांपेक्षा जास्त प्रीपेड मोबाइल फोन आणि व्हॉट्स अ‍ॅप सह इंटरनेट सेवा सध्या बंद आहे.

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी सांगितले की इंटरनेट सेवा लवकर सुरु करण्यात येईल. परंतू सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते याला 2 महिन्याचा कालवधी लागेल. तर प्रिपेड सेवेवर येत्या महिन्यात निर्णय होईल. जम्मू मध्ये प्रतिबंधानंतर काही दिवसात संचार सेवा सुरु करण्यात आली होती आणि ऑगस्टमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, 18 ऑगस्टला मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

संचार सेवा बंद करणे हा सरकारचा महत्वाच्या निर्णयांमधील निर्णय होता. या अंतर्गत राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, अतिरिक्त सुरक्षा दलाला तैनात करण्यात आले होते. हे सर्व निर्णय संघर्ष टाळण्यासाठी घेण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये 70 लाख मोबाइल वापरकर्ते आहेत. यात जास्त पोस्टपेड वापरकर्ते आहेत. यांची संख्या 40 लाखाच्या घरात आहे, परंतू राज्यातील 30 लाख प्रीपेड यूजर्सला सेवा मिळण्यास वाट पाहावी लागणार आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले नाही की सेवा कधी सुरु करण्यात येईल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी