पूर ओसरतोचनाही तोवर केरळमध्ये दुसरे संकट 

एर्नाकुलम : वृत्तसंस्था
केरळ यामध्ये पुराचं पाणी असताना त्यानां आता दुसऱ्या संकटाचा सामना करत आहेत, केरळच्या नागरिकांना आणखी एका भयानक संकटाचा सामना करावा लागतोय. एर्नाकुलममधील  भागात संतोष कुमार यांच्या पायाला काहीं तरी चावल्यासारखे वाटलं. त्यावर त्यांनी घरगुती उपाय केले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांना हे सांगितलं. तेथील डॉक्टरांनी त्यांना हळद लावली मात्र त्याबरोबर संतोष कुमार जागीच पडले.  परिसिस्थिती लक्षात घेता त्यांना तात्काळ  जवळच्या दवाखान्यात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णाला सर्पदंश  झाल्याचे निदर्शनास आढळले. तशी त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिली. संतोष आता आयसीयूमध्ये आहेत, तेथील डॉक्टरांनी यावर बोलताना सांगितलं की आम्ही सर्पदंशावर मागील ४० वर्षापासून उपचार करत आहोत.
आता पर्यंत पुराचं पाणी ओसरल्यानंर सर्प दंशांची  पन्नास च्या पुढे घटना घडल्या आहेत. या घडलेल्या घटनांमुळे लोकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधिच पुराचे पाणी कमी होतय तोवरच दुसरे संकट त्यांच्यासमोर आ वासून उभे राहिले आहे. पुराचं पाणी ओसरल्यानंतर सर्प दंशाची ५० प्रकरणं समोर आली आहेत. यातील ७० टक्के दंश हे दुर्देवाने कोरडे होते, कोरडे म्हणजे ज्यात सर्प फक्त चावतो, आपलं विष सोडत नाही.  ज्या घरचे पाणी कमी झाले आहे. शा घरात जास्त साप आढळून येत असल्याचं, सुपरिचित सर्प मित्र वावा सुरेशने सांगितले आहे.
[amazon_link asins=’B07434ZB1V,B07B9SMJ19′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8ffe291-a6e7-11e8-8f8e-655b4c945d26′]
यावर उपाय आणि मदत म्हणून पुण्याच्या एका फार्मा कंपनीने ५०० अॅन्टी व्हेनम, सब्सिडीच्या दरात दिले आहेत. १५० अॅन्टी व्हेनम केरळमध्ये पोहचल्या आहेत.  पुन्हा अशी घटना केरळमध्ये  घडल्यावर त्यावर  लगेच उपाय म्हणून काय करता येईल, त्यांच्या मदतीसाठी एक वेब पेज सुरू करण्यात आलं आहे, ते यापूर्वी सर्पदंश झालेल्या व्यक्तीने सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच सर्प मित्रांचे  मित्रांचे व्हॉटसअॅप नंबर, तसेच विषारी साप कसा ओळखता येईल. याची माहिती देखील या वेबसाईटला देण्यात आली आहे.
पूर ओसरल्यानंतर सर्वात जास्त सर्प दंशाचे बळी  पडले होते.  साप जुलै ते ऑगस्ट महिन्यात अँडी घालतो. कोब्रा ६० अंडी घालतो, सापाची पिलं हे ड्राय बाईट करत नाहीत, अनेक वेळा ते विष सोडतात, त्यामुळे मृत्यू ओढवण्याचं प्रमाण वाढतं.