क्वारंटाइन सेंटरमध्ये मुलाला चावला साप, काही तासातच झाला मृत्यू

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी कामगार आपल्या गावी परतले, तेव्हा ते स्वत:च क्वारंटाइन झाले. ज्या गावात त्याला क्वारंटाइन करण्यात आले, त्या शाळेत एका १६ वर्षाच्या मुलाला सापाने चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही आश्चर्यकारक घटना उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील आहे.

लॉकडाऊन दरम्यान हरियाणाच्या कैथलहून आलेले लोक घरातल्यांच्या सल्ल्यावरून गावातीलच शाळेत स्वत: क्वारंटाइन झाले. तेथे गुरुवारी रात्री एका १६ वर्षाच्या किशोरला सापाने चावले, ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोंडाच्या वजीरगंज ब्लॉकमधील इमलिया गावात एक शासकीय कनिष्ठ हायस्कूल आहे, जिथे हरियाणाच्या कैथल येथून आलेल्या लोकांनी गुरुवारी आपल्या कुटुंबातील लोकांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाइन केले, तेथे एका १६ वर्षीय किशोर महेंद्र कुमारला रात्री विषारी सापाने चावले. सापाने चावल्यावर तिथे खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने सापाला ठार मारले.

कुटुंबीयांनी सांगितले की, रात्री १२ च्या सुमारास सापाने मुलाला चावले. सापाने मुलाचे बोट धरले होते. तर मुलानेही सापाला पकडले होते. त्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. रुग्णवाहिका आली नाही तेव्हा स्वतः मोटारसायकलने जखमी किशोरला जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

अप्पर जिल्हा अधिकारी म्हणाले की, घटनेचा अहवाल मागवला जात आहे. अहवालाच्या आधारे आपत्तीतील तरतुदीची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येईल.