जीव धोक्यात घालून काढला ‘नागाच्या तोंडातून साप’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली येथील बुधगाव कॉलेजच्या पाठीमागे राहणाऱ्या हक्के कॉलनी परिसरात सांबवेकर यांच्या घरामध्ये साप शिरला होता. याची माहिती सर्पमित्र गजानन जाधव यांना कळविण्यात आली. जाधव यांनी नागाला पकडले असता, त्‍याच्या तोंडातून घोणस जातीचा विषारी साप बाहेर पडला. नागापेक्षा विषारी जातीचा घोणस नागाच्या पोटातून बाहेर पडल्‍याने नागरिकांना आश्यर्य वाटले.

सांबवेकर यांच्या घरामध्ये साप शिरल्‍याने सर्पमित्र गजानन जाधव यांना बोलविण्यात आले होते. जाधव यांनी घरात जाउन पाहिले असता, त्‍यांना साडेपाच फूट लांबीचा नाग आढळला. त्यानंतर प्रयत्‍नाने त्‍यांनी या नागाला पकडले. या नागाला पकडून जाधव यांनी उचलेले असता, नागाच्या तोंडातून त्‍यांना दुसर्‍या सापाची शेपटी बाहेर येत आल्‍याचे त्‍यांना दिसले.

त्यानंतर त्यांनी त्या नागाला आणखी वर उचलल्‍यावर नागाच्या तोंडातून घोणस जातीचा साप नागाच्या तोंडातून बाहेर आला. मात्र तो मृत झाला होता. सर्पमित्र जाधव यांनी मोठ्या धाडसाने स्वतः चा जीव धोक्यात घालून चपळाईने या नागाला पकडून नागरी वस्‍तीपासून दूरवर ठिकाणी नेउन सोडले. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.