महादेवाच्या मंदिरातून नाग मूर्ती चोरीला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून महादेवाच्या मंदिरातून नऊ किलो वजनाचा तांब्याचा नाग आणि अर्धा किलो वजनाची गोलाकार घनटी चोरीला गेली आहे. हा प्रकार मरकळ गावात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे.

जाहिरात

या प्रकरणी सुरेश आनंदराव लोखंडे (३४, रा. मरकळ) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मरकळ येथील महादेव मंदिरात रविवारी चोरी झाली. चोरट्यानी नऊ किलो वजनाचा नाग आणि अर्धा किलो वजनाची घनटा चोरुन नेलेली आहे.
जाहिरात

शहरामध्ये यापूर्वी मंदिरात चोरी केल्याचे प्रकार घडलेले आहेत. नव्याने सुरु झालेल्या आयुक्तालयात मंदिरात चोरी झाल्यचा हा पहिलाच आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पालकांनो, सावधान ! बालगोविंदाच्या सहभागाबद्दल तुमच्यावरही  होऊ शकते कारवाई

[amazon_link asins=’B0778JFC13,B07DYFX2C8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c5b92349-af4c-11e8-9cbc-519e0dbb0270′]