खांद्यावर ‘साप’, हातात ‘माइक’, महिला पत्रकार बोलताच झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका टीव्ही शो मध्ये एक रिपोर्टर सापापासून कसे वाचावे हे सांगत होती, परंतु साप रागात आहे हे कळताच ही रिपोर्टर घाबरली. ही घटना बुधवारी घडली. एका वृत्तानुसार एक ऑस्ट्रेलियन टीव्ही चॅनल जर्नलिस्ट साराह कॉटे ऑस्ट्रेलियातील शहर वागा वागा हून कवरेज करत होती. या दरम्यान तिच्या खांद्यावर एक साप होता.

साराह माइकवर सापापासून सुरक्षेच्या बाबतीत सांगत होती. जेव्हा रिपोर्टरने माइकवर बोलने सुरु केले तेव्हा अचानक सापाने वेगाने माइकवर हल्ला केला. यामुळे महिला रिपोर्टरच्या चेहऱ्यावर भीती दिसली.

यामुळे रिपोर्टरची बोलतीच बंद झाली, साप मायक्रोफोनवर पुढे येत होता, त्यानंतर जेव्हा स्नॅक हँडलरने (सर्प मित्र) सापाच्या समोर हात हालवला तेव्हा साप नियंत्रणात आला. त्यानंतर हिंमतीने साराहने आपले राहिलेले बोलणे पूर्ण केले आणि कसाबसा आपला शॉट पूर्ण केला.

साराह म्हणाली की एका खास शॉटसाठी मला साप खांद्यावर ठेवायचा होता. जसे की मी बोलण्यास सुरुवात केली, सापाने माइकवर हल्ला केला. जेव्हा सापाने माइकवर हल्ला केला, तेव्हा त्या जवळच माझा हात होता. हे अत्यंत भीतीदायक होतं.