काय सांगता ! होय, भुकेलेल्या सापाने गिळली सव्वा किलोची कोंबडी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोल्ट्रीफार्ममध्ये घुसून सापाने snake अंडी व कोंबडीची पिल्ले खाण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. पण चक्क मोठी कोंबडी खातानाचा प्रकार पहिल्यादाच घडल्याचे दिसून आले. भुकेने व्याकूळ झालेल्या व भक्ष्याच्या शोधात पोल्ट्री फार्ममध्ये घुसलेल्या साडे तीन फूट नागाने snake चक्क सव्वा किलोची कोंबडी गिळली. ही घटना सोलापूर नजीकच्या खेडे या गावात घडली आहे.

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

बार्शी रोडवरील खेड पाटी येथील रहिवासी सोमनाथ तांदळे हे त्यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये सायंकाळी पावणे आठच्या सुमारास नियमितपणे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी गेले.
त्यांना तिथे एक साप snake कोंबडीला मारून गिळत असल्याचे दिसले.
त्यांनी लगेच वाईल्ड लाईफ कॉझर्वेशन सर्कलच्या सुरेश क्षीरसागर यांना फोनवर समोर दिसणाऱ्या दृश्याबद्दलची माहिती दिली.
त्यावेळी सुरेश क्षीरसागर व चंद्रशेखर धनशेट्टी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतील आणि पाहणी केली.
पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबड्याना अंडी घालण्यासाठी ठेवलेल्या डेऱ्यांच्या बाजूला साधारण साडेतीन फूट लांबीचा नाग प्रजातीचा विषारी साप एक जिवंत कोंबडी गिळत असल्याचे दिसून आले.
तेव्हा क्षीरसागर यांनी त्यांच्या नैसर्गिक प्रकियेत व्यत्यय न आणता आडबाजूला बसून त्याचे निरीक्षण करत ही घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली.

दरम्यान, सापाने त्या कोंबडीला तिच्या मानेपर्यत गिळले होते पण,
हे भक्ष्य मोठे आहे हे त्या सापाच्या लक्षात आले.
त्याने त्या कोंबडीला तोंडातून सोडले आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सर्पमित्रांनी त्याला सुरक्षितपणे एका पी.व्ही.सी. पाईपमध्ये बंद केले.
त्यानंतर त्या नागाला तांदळे यांनी साधारणपणे दोनशे मीटर अंतरावर नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी भक्ष्यस्थानी पडलेल्या त्या कोंबडीचे वजन केले आणि ती सव्वा किलोची असल्याचे स्पष्ट झाले.
पोल्ट्रीफार्म चालक तांदळे यांनी प्रसंगावधान राखून सापाला वाचविण्यास प्राधान्य दिले.
याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या