धक्कादायक ! भूक लागल्यावर ‘हा’ साप स्वतःचेच शेपूट खातो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादा प्राणी भुकेलेला असेल तर तो भूक भागवण्यासाठी दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करतो. मिळेल ते मांस खातो किंवा शिकारीच्या तयारीत थांबतो. मात्र सोशल मीडियावरती एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक भुकेलेला साप खाण्यासाठी काहीही नसल्यामुळे आपल्याच शरीराचा भाग चावत आहे.

फॉरगॉटन फ्रेंड रेपटाइल सेंचुरी नामक फेसबुक पेजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात स्पष्टपणे साप स्वतःचाच दुसरा भाग खाताना दिसत आहे. व्हिडीओ बाबत माहिती देणारा म्हणतो की, हे अशा प्रकारचे साप एकतर दुसऱ्या सापांना खातात किंवा दुसरे काही मिळाले नाही. तर स्वतःचाच एखादा भाग खातात.

साप जेव्हा आपल्या शेपटीला चावट असतो. तेव्हा त्याला यातून सोडवले जाते आणि या व्हिडिओमध्ये त्याच्या तोंडातील रक्त स्पष्टपणे दिसते. नंतर साप त्याच्या जागेवर पुन्हा निघून जातो. मात्र सोशल मीडियावर या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे आणि लोक याला मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –