Video : भुसावळमध्ये भर रस्त्यावर आले नाग-नागिण, व्हिडीओ व्हायरल

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळा सुरु झाल्यानंतर ठिकठिकाणी सापाचे दर्शन होत असते. सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आसतात. मात्र, सध्या भूसावळ येथील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. भूसावळ शहरातील मोरेश्वर नगर भागात नाग-नागिणीच्या प्रणयाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे.

मोरेश्वर नगर भागात भर रस्त्यावर नाग आणि नागिणीला एकत्र पहायला मिळाले. नाग-नागिणीची प्रणयक्रीडा बऱ्याच वेळ सुरु होती. त्यानंतर ते दोघे रस्त्यालगतच्या नाल्यात गेले. या दरम्यान या रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद होती. नाग-नागिण निघून गेल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

पावसाळा हा सापांना प्रणय क्रीडा करण्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. पावसाळ्यात मोकळ्या जागी येऊन साप प्रणयक्रिडा करतात, असं जाणकारांचे मत आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रतीक्षेनंतर सर्वजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. तसेच सापंच्या प्रजाती देखील पावसाची वाट पहात असतात. गरमीने बेहाल झालेल्या सापांच्या प्रजाती पाऊस कधी पडेल याची वाट पहात असतात. पावसाळा सुरु होताच हे साप मोकळ्या जागेत थंडीचा अनुभव घेण्यासाठी म्हणून बिळातून बाहेर पडतात आणि प्रणय क्रीडा करतात.