International Woman’s Day 2020 : PM मोदींच्या ट्विटर हँडलवरून ‘या’ महिलेनं केलं पहिलं ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार त्यांचे सोशल मीडिया अकाउंट महिलांकडे सोपवले आहे. त्यानुसार आज स्नेहा मोहन दास यांनी पंतप्रधान मोदी यांच्या @narendramodi या ट्विटर हँडलवरून सर्वप्रथम ट्विट केले. स्नेहा दास यांनी आपण फूड बँकेच्या संस्थापक असल्याची माहिती या ट्विटद्वारे दिली.
२०१५ मध्ये चेन्नईत पूर येण्यापूर्वी स्नेहा दास यांनी फूड बँकेची स्थापना केली होती. ट्विटरवरील या व्हिडिओद्वारे स्नेहा यांनी आपल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. भुकेशी लढणे आणि भारतात कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही, हाच या फूड बँकेचा उद्देश आहे. माझ्या आजोबांच्या जन्मदिनानिमित्त माझी आई मुलांना बोलावून त्यांना जेवण देत असे. हे काम पुढे नेण्याचा माझा संकल्प होता. यातूनच फूड बँकेची कल्पना पुढे आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
You heard of food for thought. Now, it is time for action and a better future for our poor.
Hello, I am @snehamohandoss. Inspired by my mother, who instilled the habit of feeding the homeless, I started this initiative called Foodbank India. #SheInspiresUs pic.twitter.com/yHBb3ZaI8n
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
फूड बँकेचे काम :
फूड बँकेसाठी काम करणारे स्वयंसेवक जेवणासाठीचे सर्व सामान लोकांकडून दानस्वरुपात घेते. त्यानंतर त्या सामग्रीने जेवण तयार करून ते गरिबांना वाटतात. ज्या-ज्या घरात वाढीव अन्न तयार होते, अशी कुटुंबे आपले उर्वरित ताजे जेवण फूड बँकेत जमा करतात. फूड बँक चेन्नई या नावाने फेसबूक पेज तयार केले. याद्वारे फूड बँकेचे काम चालते. तसेच त्यांनी लोकांना आपापल्या राज्याच्या, शहरांच्या नावाने फूड बँकेचे पेज तयार करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर भारतात अशा प्रकारे १८ ठिकाणी फूड बँक सुरू झाल्या. या बरोबच एक फूड बँक दक्षिण आफ्रिकेतही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त आपले सोशल अकाउंट लोकांना प्रेरित करणाऱ्या ७ महिलांच्या हाती सोपवले. देशातील महिलांनी विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यातून लाखो लोकांनी प्रेरणा घेतल्याचे मोदी यांनी म्हटले. अशा महिलांचे यश साजरे करत त्यांच्याकडून काही शिकले पाहिजे,असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
Greetings on International Women’s Day! We salute the spirit and accomplishments of our Nari Shakti.
As I’d said a few days ago, I’m signing off. Through the day, seven women achievers will share their life journeys and perhaps interact with you through my social media accounts.— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, अशा शब्दांत मोदींनी महिलांचा गौरव केला आहे. ‘मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मी आता माझ्या सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. आज दिवसभर कर्तृत्व गाजवणाऱ्या ७ महिला माझ्या सोशल अकांउंटवरून त्यांचा प्रवास, आणि त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी सांगणार आहेत. त्या तुमच्याशी माझ्या सोशल अकांउंटवरून संवाद साधणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.