Snehal Shidam – Nikhil Bane | स्नेहल शिदमनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे निखिल बनेच्या आणि तिच्या अफेअरची चर्चा सुरू

पोलीसनामा ऑनलाइन : Snehal Shidam – Nikhil Bane | महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढे सह विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या विवाहाला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्वच कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत होते. विशेष लक्ष यावेळी अभिनेता निखिल बने वेधून घेत होता. त्यामागील कारण ही तसेच होते. यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकारांसोबतच वनिताची खास आणि निखिलची खास मैत्रीण आणि ‘चला हवा येऊ द्या’ फ्रेम स्नेहल शिदम (Snehal Shidam – Nikhil Bane) हिने लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. निखिलने नुकतेच काही फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. या फोटोवरून हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

Advt.

वनिताचे लग्न धूम धडाक्यात पार पडल्याचे पाहायला मिळाले. तिच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. लग्नामध्ये निखिल व स्नेहलने एकत्र फोटो काढले होते. सध्या त्यांच्या फोटोने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. स्नेहलने त्यांचा हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करताच या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

फोटोमध्ये दिसत आहे की दोघे एकमेकांच्या हातात हात देत स्नेहल निखिलच्या
(Snehal Shidam – Nikhil Bane) खांद्यावर डोकं ठेवले आहे.
यावेळी दोघेही हसताना तर स्नेहल लाजताना दिसत आहे.
फोटो शेअर करा स्नेहल ने कॅप्शन मध्ये म्हटले की, ““पिरतीच्या फडात गं, धरला हात असा, काळीज येंधलं आरल….” .
स्नेहल ने हा फोटो शेअर करताच त्या दोघांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
अनेकांनी त्यांचे अभिनंदन देखील केले आहे.
शिवाय हे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एवढेच नाही तर त्यांच्या फोटोला श्रेया बुगडे आणि नम्रता संभेराव या कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.
तिच्या फोटोवर कमेंट करत श्रेया बुगडे ने म्हटले की, “मला तू काहीच सांगितलं नाहीस…. माझ्या मेकअप रूम मध्ये लगेच ये”.
श्रेयाच्या या मेसेजला देखील अनेकांनी स्मायली इमोजी शेअर केल्या आहेत.

Web Title :-Snehal Shidam – Nikhil Bane | maharashtrachi hasyajatra fem nikhil bane and actress snehal shidam in relationship photo goes viral on social media see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त

Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल

Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…