सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा चौथा स्नेहबंध कार्यक्रम उत्साहात पार पडला. कित्येक वर्षांनी झालेल्या एकमेकांच्या भेटीने अनेकजण गहिवरून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अमित लुंकड यांनी केले. यावेळी बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष बाबाजी गलांडे यांनी संघटनेच्या उद्देशाबद्दल मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित सदस्यांची निवड व सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे –
बाबाजी गलांडे अध्यक्ष, उमेश छाजेड उपाध्यक्ष, अमित लुंकड सचिव, मिनाक्षी वाजे खजिनदार, सदस्य- सोमनाथ साकोरे, आशिष मुथा, ईश्वर सोनवणे, संदीप पोळ आणि मोनाली परभणे. या कार्यक्रमासाठी महेशजी झगडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून मोलाची उपस्थिती लाभली. जगातील सर्व रुग्णांचा पालक म्हणजे फार्मासिस्ट असतो, हे सर्व फार्मासिस्टला माहिती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित सर्वांना विचारत आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच उपस्थितांसमोर फार्मसी चे ह्या देशातील स्थान काय आहे हे स्पष्ट केले. त्यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील वेगवेगळे अनुभव सांगितले. औषध निर्माण शास्त्र संशोधन आणि त्याची गरज याविषयी मार्गदर्शनही केले. कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय शशिकांतजी शाह यांच्या स्मरणार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून अश्विनी वाघ आणि सचिन चेडे यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास १८० हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच या कार्यक्रमात डी. फार्मसी चे बातमीपत्रक व बी. फार्मसीच्या मंथन नियतकालिकेचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे व व्यवस्थापक शिवाजी पडवळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल देशपांडे यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा –