… तर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतील : पंकजा मुंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   ऊसतोड कामगारांच्या (sugarcane-workers) प्रश्नावर मी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या दुर्गाष्टमीपर्यंत हा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करणार आहे. त्यानंतर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतील,असा इशारा माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे (Bjp leader- pankaja-munde) यांनी दिला आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऊलतोड कामगार सध्या विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ऊसतोडणी करणार नसल्याचे कामगारांनी जाहीर केले आहे. यावर तोडगा निघत नसल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. याबाबत मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे असताना लवादच्या दोन बैठकीत हा प्रश्न मार्गी लावत असत.आताही तीच परंपरा सुरु ठेवण्यात येईल. ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यात फाटे फोडण्याचे काम सुरु आहे. साखर कारखानदार, साखर संघाने हा विषय तातडीने सोडवावा, अन्यथा दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

शासनाने उदार अंतकरणाने मदत करावी

नांदेड जिल्ह्यातील धनगरवाडी, पार्डी आदी ठिकाणी त्यांनी नुकसानीची पाहणी केली सध्या शेतकरी हवालदील झाला आहे. पावसाने भेदभाव केला नाही. त्यामुळे सरकारनेही भेद करू नये.अस्मानी संकट आले असताना सुलतानी संकटापासून वाचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी अंत्यत उदार अंतकरणाने शासनाने मदत करावी.