… म्हणून सेक्युलर देश असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष शपथविधीवेळी ठेवतात बायबलवर हात; काय आहे कारण जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन आज शपथ घेणार आहेत. जो बायडन यांच्या शपथविधीसाठी आज अमेरिकेची जधानी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यानिमित्ताने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीवेळी पाळल्या जाणाऱ्या काही परंपरा आहेत. त्याविषयी जाणून घ्या..

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. यावेळी न्यायाधीश शपथ घेणाऱ्या व्यक्तीला हात वर करण्यास सांगतात आणि शपथ देतात. तसेच देव तुम्हाला ही जबाबदारी पार पाडण्यासाठी बळ देवो, असे म्हणतात. या शपथविधीवेळी तिथे बायबलही ठेवले जाते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीवेळी बायबल हातात ठेवण्याची परंपरा ही देशाच्या तत्कालीन प्रथम महिला बर्ड जॉन्सन यांनी सुरू केली आहे. त्यांनी जॉन्सन यांच्या शपथविधीवेळी हातात बायबल ठेवले होते. तेव्हापासून ही परंपरा रूढ झाली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीवेळी मेलेनिया ट्रम्प यांनी हातात बायबल धरले होते. मात्र या परंपरेला अमेरिकन घटनेने कुठलीही कायदेशीर मान्यता दिलेली नाही. अमेरिकेच्या राज्यघटनेत राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीची तारीख नमुद करून ठेवण्यात आलेली आहे. तरीही राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी वेगवेगळ्या तारखांना झाल्याची उदाहरणे आहेत. १९३७ पर्यंत ५ मार्चला हा शपथविधी होत असे. अखेर २० व्या घटनादुरुस्तीमध्ये शपथविधीसाठी २० जानेवारी ही तारीख निश्चित केली केली. या दिवशी शपथ घेणारे फ्रँकलिन रुझवेल्ट हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी हा २० जानेवारीला होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद काही कारणाने रिक्त झाल्यास अन्य देशांप्रमाणे मध्यावधी निवडणूक होत नाही. तर उपराष्ट्राध्यक्षांकडे सत्तेची सूत्रे येतात आणि ते उर्वरित कार्यकाळासाठी ते पदावर राहतात.या दरम्यान, आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बायडेन यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून व्हाइट हाऊसची नोंद होईल. बायडेन यांनी तीनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना दोन वेळा अपयश आले. अखेर तिसऱ्या प्रयत्नात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद जिंकले आणि ठरले.