आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्याशी चांगलं जमतंय परंतु आमच्याशी का जमत नाही हे माहित नाही. परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असे सूचक विधान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली.

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

 

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी दिल्ली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधला.
याचे आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन ते तिथे गेले होते, त्यामुळे ही चांगली बाब आहे.
असं म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

वाघाची दुश्मनी कधीच नव्हती
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले, दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडलं असेल हे सांगता येणार नाही.
वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती.
त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटलांशी पटत नाही.
जर आमच्याशी मैत्री असती तर 18 महिन्यापूर्वी आमचं सरकार आलं असतं, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पण आमच्याशी का जमत नाही ?
चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय परंतु आमच्याशी का जमत नाही हेच माहिती नाही.
पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं सूचक विधानही चंद्रकांत पाटील यांनी केलं.

मराठा आरक्षणाची मागणी दिशाभूल करणारी
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, भेटीदरम्यान त्यांनी केलेल्या काही मागण्यांचं स्वागत करतो. परंतु मराठा आरक्षण संबंधीची मागणी ही दिशाभूल करणारी आहे. केंद्राकडे आणि मोदींकडे आरक्षणाचा काहीच मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. पण, केंद्राने यावर मार्ग काढण्यास प्रयत्न करण्याचे सांगितले आहे. पण मराठा आरक्षण आणि केंद्राचा काहीच संबंध नाही. तो राज्य सरकारचा अधिकार आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण