Mumbai : दिलासादायक ! आतापर्यंत 88 % रुग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 14 लाख 68 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 252888 रुग्ण बाधित आढळले आहेत. म्हणजेच मुंबईतील बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे 17.17 टक्के ए़वढं आहे.

दरम्यान बुधवारी 1354 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 जणांनी आपला जीव गमावला आहे. याशिवाय 1716 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आतापर्यंत 88 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 144 दिवसांवर गेला आहे.

पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेश कडणे (44) यांचा कोरोनामुळं बुधवारी मृत्यू झाला. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कडणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 ऑक्टोबर रोजी समोर आलं होतं. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते बोरिवली वसाहतीत वास्तव्यास होते.

मंगळवारपर्यंत राज्यभरात पोलीस दलातील 26254 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पोलीस दलातील 2870 अधिकारी आणि 23384 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 1589 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 27 अधिकाऱ्यांचा व 255 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

You might also like