… म्हणून सरकार 5 वर्षे टिकणार, राऊतांनी सांगितले ‘पावर’फुल कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले खरे परंतु काँग्रेससोबत जुळवून घेताना शिवसेनेला कसं जमणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. भाजपने तर शिवसेनेची कोंडी करण्याचा वारंवार प्रयत्न केला. नुकतेच राहुल गांधी यांनी ‘मी राहुल सावरकर नाही’ असे विधान केले होते त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या या विधानावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. खासदार संजय राऊत यांनी याबाबत रोख ठोक भूमिका घेत कुणीही सावरकरांचा अवमान करू नये असा इशारा दिला आहे.

सध्या राज्यात असलेले सरकार हे तीन पक्षांचे मिळून स्थापन केलेले सरकार आहे त्यामुळे तीन वेगवेगळ्या विचारधारांचे सरकार किती दिवस चालेल असा सवाल सर्वच स्तरांतून विचारला जात होता. सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी हे सरकार पाच वर्ष चालेल कारण सरकार चालवणाऱ्या प्रमुख नेत्यांकडे दिलगिरी आहे.

तसेच मी शरद पवार यांना विचारले की अजित पवारांचं काय ? त्यावर शरद पवार यांनी विश्वास दिला की, तुम्ही निश्चिंत रहा अजित पवारच पाच वर्षांसाठी हे सरकार चालवतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्र निश्चिंत आहे कारण हे सरकार टिकावं यासाठी शरद पवार स्वतः उभे आहेत, त्यामुळे काळजी नसावी असे संजय राऊत म्हणतात.

भाजपकडून वारंवार शिवसेनेला लक्ष केले जातंय. तसेच भाजप वारंवार अजित पवार यांच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतंय तर आमची दारं अजूनही खुली आहेत असं म्हणून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याचे मत भाजपने व्यक्त केले होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/