Lockdown बाबत फडणवीसांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

नागपूर : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये काही निर्बंध पुन्हा लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नागपूरमध्ये लॉकडाउन लागू केला आहे. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ‘लॉकडाउन हा पर्याय नाही. मात्र, नागपूरमध्ये सात दिवस लॉकडाउन केला आहे. प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावला पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही’

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक बोलावली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार बैठकीला उपस्थित आहे. यावर फडणवीस म्हणाले, रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे. त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे. रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला तर यावर बैठकीत तोडगा काढला जाईल. जे काही जनतेसाठी करता येईल ते करू, असे स्पष्ट करताना पुढे ते म्हणाले, ‘लॉकडाउन हा पर्याय नाही. मात्र, सात दिवस लॉकडाउन केला आहे. प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावला पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही’.

उपाययोजनेवर चर्चा होणार

नागपुरात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत मृतांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला आलो आहे. तात्काळ काय उपाययोजना करता येईल, या अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.