‘…म्हणून मी वडिलांच्या आठवणी सांगणे बंद केले’; इरफानचा मुलगा बाबीलने केला खुलासा

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ज्यांच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपटांमधील कामाने त्यांना लोकांच्या मनो-मनात रुजून ठेवलं, ते म्हणजे इरफान खान. 29 April 2020 ला इरफान खान यांचे कर्करोगाने निधन झाले. नुकतेच त्यांना फिल्मफेरे पुरस्कार देखील मिळाला.

इरफान खानचा मुलगा बबील यांनी खुलासा केला की त्याने सोशल मीडियावर आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणी शेअर करणे का बंद केले. अनेकांनी त्याला संदेश दिला की तो स्वत: ची प्रसिद्धी करण्यासाठी त्याच्या वडिलांचा म्हणजेच इरफानचा वापर करीत आहे.

Babil Khan Instagram Story.JPG

बाबील ने त्याच्या स्टोरी मध्ये असं लिहिले कि, “जेव्हा खरोखर मी बाबांच्या चाहत्यांमधील रिक्त जागा भरून काढण्यासाठी मनापासून आठवणी सांगत होतो तेव्हा मला अनेक जणांनी असा संदेश पाठवला कि तू तुझ्या वडिलांचा वापर तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी करत आहेस. हे वाचून मला खरोखर त्रास होतो,”

बाबील खान पुढे असं देखील म्हणाला कि, “मी प्रचंड गोंधळून गेलो आहे आणि योग्य वेळ आली कि मी पुन्हा एकदा आमचे फोटो शेअर करणे सुरु करेल.”