‘या’ कारणामुळे शपथविधीसाठी ‘गैरहजर’ राहीलो, संजय राऊत यांनी केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती मात्र काल झालेल्या मंत्र्यांच्या शपतविधी सोहळ्यासाठी संजय राऊत अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचे मंत्रिपदातील यादीमधील नाव वगळून ऐन वेळेवर आदित्य ठाकरेंना त्या जागी स्थान देण्यात आले होते आणि याच कारणामुळे संजय राऊत नाराज असल्याने काल झालेल्या सोहळ्यासाठी उपस्थित राहू न शकल्याचे जोरदार चर्चा सुरु होत्या मात्र स्वतः याबाबत भाष्य करत राऊत यांनी खुलासा केला आहे. यावेळी बोलताना आम्ही पक्षाकडे काही मागणारी लोक नसून पक्षाला योगदान देणारी लोक असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले नेमकं संजय राऊत यावेळी
मी सकाळपासून सामना कार्यालयात बसून काम करत आहे. मला असं सांगाव की मी कधी अशा कार्यक्रमांना हजर राहिलो आहे. सरकारी कार्यक्रम, मंत्रालयातील कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम, विस्ताराचे कार्यक्रम. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशाप्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमांना हजर राहिलो नाही. फक्त 1 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना मी हजर राहिलो, हा एक अपवाद आहे. तेही शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, उद्धव ठाकरे शपथ घेतायंत म्हणून मी आजारी असतानाही तिथे थांबलो होतो. पण, त्याच्या आधी किंवा नंतर मी शासकीय कार्यक्रमाला कधीच हजर राहिलो नाही. मला बोलवतात, पण माझा तो पिंड नाही, असे म्हणत मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर असण्याचं कारणच नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे तसेच, आम्ही नाराज नाही. शिवसेनेत होतो आणि शिवसेनेतच राहू तसेच आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत त्यापुढे मंत्रिपद काहीच नाही असे सांगत राऊत यांनी मंत्रीपदाबाबतचा मुद्दा खोडून काढला आहे. दरम्यान शपथविधी नंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी आता सकारात्मक पावले उचलून राज्यासाठी खूप काही करायचे असल्याचे सांगितले होते तसेच जे कोणी नाराज आहेत त्यांना वेगळी जबाबदारी देण्यात येईल असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा