‘असे’ झाले तर कोहली ठरेल जगातील पहिला फलंदाज 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा विराट कोहलीने  वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये शतके झळकावत दमदार कामगिरी केली आहे. कोहलीने सध्या जणू धावांची टांकसाळ उघडली आहे असेच म्हणावे लागेल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्या दरम्यान कोहलीने बरेच विक्रम रचले होते. आता अजून एक संधी विराटला खुणावत आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी जर त्याने केली तर एक अनोखा विक्रम रचला जाऊ शकतो. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या लढतीत कोहलीला  एकाचवेळी 19 खेळाडूंना पिछाडीवर टाकण्याची संधी असेल. त्याचबरोबर ‘ही’ कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरणार आहे.

दुसऱ्या सामन्यातही कोहलीने शतक झळकावत दहा हजार धावांचा पल्ला गाठला होता. कोहलीने पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकावले होते आणि भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दहा हजार धावांचा पल्ला गाठून त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले होते. पण या सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. शाई होपने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावल्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही कोहलीने शतक झळकावले होते, पण भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांना न्यायालयाचा दणका

कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर एका मालिकेत चार शतके लगावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरणार आहे. आतापर्यंत कोहली चार सामन्यांमध्ये तीन शतके लगावण्यास यशस्वी झाला आहे. आतापर्यंत तब्बल 19 खेळाडूंनी एका मालिकेत तीन शतके लगावली आहेत. त्यामुळे कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर तो तब्बल 19 फलंदाजांना एकाच वेळी मागे टाकू शकतो. आणि या कामगिरीने तो एक अनोखे रेकाॅर्ड आपल्या नावावर करू शकतो.