‘या’ कारणामुळं ‘भाईजान’ सलमानच्या ‘दबंग 3’ ला हिंदू जनजागृती समितीचा ‘विरोध’, तीव्र आंदोलनाचा इशारा !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 या सिनेमात काही दृश्यांमध्ये हिंदू साधूंचा आणि देवतांचा घोर अवमान करण्यात आला आहे, असे म्हणत हिंदू जनजागृती समिती आणि अन्य संघटनांनी आक्षेप घेतला आहे. साधू-संतांना पाश्चात्यांप्रमाणे हिडीसपणे नाचताना दाखवून त्यांचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू संघटना गेल्या 21 दिवस देशभरात आंदोलन करून सिनेमातील दृश्ये वगळावी अशी मागणी सेन्सॉर बोर्ड आणि स्थानिक प्रशासनाकडे करत आहे. आम्ही रस्त्यावर उतरून सिनेमाला विरोध करू अशी भूमिका समितीनं घेतली आहे.
17 डिसेंबर रोजी हिंदू जनजागृती समितीनं मुंबईतील सेन्सॉर बोर्ड कार्यालयात जाऊन विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. 20 डिसेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सर्व आक्षेपार्ह दृश्ये वगळली न गेल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिला. हिंदू साधू-संताचा अपमान हिंदू समाज सहन करणार नाही असंही त्यांनी म्हटलं.
सलमानच्या दबंग 3 या सिनेमातील हुड हुड दबंग दबंग या गाण्यात अनेक साधू संतांना पाश्चात्यांप्रमाणे हिडीसपणे नाचताना आणि गिटार वाजवाताना दाखवण्यात आलं आहे. काही साधूंच्या जटा गाण्याच्या तालावर ठेका धरत उडवताना दाखवण्यात आल्या आहेत. यावर हिंदू जनजागृती समितीनं आक्षेप घेतला आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष
- रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !
- कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या
- ‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती