विरोधातील अनेक भाजपात येण्यासाठी उत्सुक, पवारांच्या बाजूनं एकतरी माणूस शिल्‍लक राहतो का ते पहावं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शिवसेना भाजपची वाट धरली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यावरून आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांवर टीका करत त्यांना इशारा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत ५० पेक्षा अधिक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच आगामी काळात पवारांच्या बाजूने एक आकडी संख्या असणारे लोकही राहतायेत का याकडे त्यांनी बघावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

आपल्या पक्षातून लोक का जात आहेत याचे त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्याचं खापर भाजपावर फोडलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत. त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात आहेत, असे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले आहे. तसंच आम्ही पक्ष वाढवतो आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन नवीन नेते, नवीन कार्यकर्ते आमच्याकडे येतात, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपलं कुठे चुकतं हे बघावं. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीवर आली आहे. नवीन पिढी त्यांच्याकडे जायला तयार नाही. तर येत्या आठवडाभरात अनेक पक्षप्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त