तर… एमआयएम महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही : ओवेसी

नांदेड  : पोलीसनामा ऑनलाइन- काँग्रेस पक्षाने  प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा दिल्या तर एमआयएम महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा एमआयएमचे नेते खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज ( १७ जानेवारी ) नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान देशात समता, बंधुता आणि ऐक्य हे धोक्यात आहे. संविधान बदलणारे हे संसदेत तर संविधान वाचविणारे बाहेर आहेत. कॉँग्रेसने  प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा दिल्या तर एमआयएम महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही,अशी घोषणा एमआयएमचे नेते खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी केली.दरम्यान देशातील दलित, मुस्लिम आणि ओबीसीचा वापर आजपर्यंत फक्त निवडणुकीपुरता केला. देशाला सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले. परंतु आजही देशातील वंचित समाज हा वंचितच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्‍ट्रवादीचे शरद पवार, राहूल गांधी आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी आश्‍वासनाशिवाय काहीच दिले नाही. असे  एमआयएम अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, त्यांची कूटनिती आपण ओळखली पाहिजे. तेलंगणात सर्वजण आले मात्र त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. सध्या महाराष्ट्रात एकच नेते ऍड . प्रकाश  आंबेडकर हे वंचितांसाठी लढत आहेत. त्यांना साथ देणे हे मी माझे कर्तव्य व भाग्य समजतो. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजावर फोर मोठे उपकार केले आहेत. त्यांची परतफेड करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. असेही ते म्हंटले.

याचबरोबर महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ अबाधित राहण्यासाठी व संविधान वाचविण्यासाठी मी आलो आहे. मला निवडणुका लढायच्या नाहीत. कुठलीच अपेक्षा नाही, परंतु वंचित समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. कॉँग्रेसला एमआयएम चालत नसेल तर मी मोठे मन करून एकही जागा लढणार नाही. मात्र  प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मागितलेल्या जागा काँग्रेसने सोडाव्यात सोडाव्यात. अशी मागणीही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, मुस्लिमांनी आणि वंचित समाजाने कॉँग्रेस व भाजपच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. असे आवाहनही त्यांनी केले. तसेच संविधान वाचविण्यासाठी प्रकाश  आंबेडकर यांचे हात बळककट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष म्हणजे ओवेसी यांच्या भाषणा नंतर प्रकाश आंबेडकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले, त्यावेळी देशात सध्या मनुवादी सरकार आहे. आरएसएसकडून देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद येऊ घातला आहे. या सांस्कृतिक राष्‍ट्रवादाला देशाचे काही देण घेण नाही. त्यांना फक्त देश हा संस्कृतीवर चालणारा असावा असे वाटते. राज्यातील बाॅम्बस्फोटातील आरोपी हे सर्वाधिक आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, त्यावेळी त्यांनी भाजप, शिवसेना, भिडे गुरूजी, मोहन भागवत यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले.