म्हणून ‘मुन्‍नाभाई’ उतरला निवडणुकीच्‍या मैदानात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुन्नाभाई आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या बहिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांनी आज उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रिया दत्तसोबत संजय दत्तही दिसून आला. ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आणि सायराबानो यांना भेटून आशीर्वाद घेतले असल्याचे प्रिया दत्तने सांगितले आहे.

प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उत्तर मध्य मुंबईतील भाजपा सेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांना प्रिया दत्त टक्कर देणार आहेत. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पूनम महाजन या कन्या आहेत.

बांद्रा आणि कुर्ला याठिकाणी प्रिया दत्त यांचा दबदबा होता. 2014 मध्ये भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांना पराभव करत येथून विजय मिळवला. मागील निवडणुकीत पराभव झाल्याने प्रिया दत्त यांनी यावेळची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा आणि कुर्ला हे उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात येतात. यावेळी उत्तर मध्य मुंबईत यावेळी प्रिया दत्त विरुद्ध पूनम महाजन लढत रंगणार आहे. यावेळीही विद्यमान खासदरा पुनम महाजन विजयी होतात की, आपला दबदबा असणाऱ्या प्रिया दत्त यावेळी विजयी होतात हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे.

Loading...
You might also like