‘…तर कोणीही तुम्हाला हात लावत नाही, मग तो पंतप्रधान असो किंवा गृहमंत्री’ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकदा समोरच्यानं तुमची हिंमत पाहिली तर मग समोरचा व्यक्ती पंतप्रधान असो वा गृहमंत्री असो किंवा मग अंडरवर्ल्ड डॉन असू द्या त्याची तुमच्या अंगावर येण्याची हिंमत नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “भीती माणसाच्या मनात असते बाकी काही नाही. कोणीही आपल्याला हात लावत नाही. तुमची हिंमत एकदा समोरच्याने पाहिली तर मग समोरचा व्यक्ती पंतप्रधान असो वा गृहमंत्री असो किंवा मग अंडरवर्ल्ड डॉन असू द्या त्याची तुमच्या अंगावर येण्याची हिंमत नाही. मी अनेक वर्षे पाहिलं आहे. कोणीही तुम्हाला हात लावत नाही. मी नेहमी सांगतो हिंमत असेल तर माझ्या अंगावर या. समोर सांगतो मी इथं आहे या. माणूस एकतर मृत्यूला घाबरतो किंवा मग तुरुगांत जायला घाबरतो परंतु मी या दोन्ही गोष्टीला मी घाबरत नाही.” असेही ते म्हणाले.

या मुलाखतीत बोलताना माधवर गडकरींनी तुला गुंड म्हटलं होत याकडे लक्ष वेधलं असताना संजय राऊत म्हणाले, “मला अजूनही लोक म्हणतात हा गुंडा आहे. मला वाईट वाटत नाही. माझी ओळख करून देताना बाळासाहेब सांगत असत ए है संजय राऊत. माय फायर ब्रँड एडिटर. एकदम जोरदार आदमी है. टक्कर मत लेना.” असेही राऊतांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like