हे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाआघाडी सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना वर्तमानपत्रातून वाचायला मिळणार आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून पोस्ट केले आहेत त्यामध्ये राऊत मुख्यमंत्र्यांना सडेतोड प्रश्न विचारत असताना मुख्यमंत्री ठाकरेही जशाच तस उत्तर देताना पाहायला मिळत आहे. या मुलाखतीचे तिन्ही भाग सामना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाला चांगलाच इशारा दिलाय. तसेच, अकरा दिवसांत सरकार पडणार अशी भाकितं करणाऱ्यांचे दात पडत आले, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

मुलाखतीत संजय राऊत यांनी अकरा दिवसांत सरकार पडणार असे भाकितं अनेकांनी केली होती, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर तसं बोलणाऱ्यांचे दात पडत आले आहेत, आता हे सरकार नक्कीच ५ वर्षे पूर्ण करणार असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिल.

ते म्हणाले, सामनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग नमस्कार घालतो, सर्वांच्या सहकार्यामुळेच, एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे. पहिल्या दिवसापासून सर्वानीच सहकार्याची भूमिका घेतली. त्यांच्याही मनात असं होत की चला आता वातावरण मोकळं झालं. चला आता कामाला लागूया! जे सहकार्य करत आहेत ते महत्त्वाचं आहे. पोलीस, महसूल तसेच सर्व प्रशासन यंत्रणा यांचंही सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच विनासायास हे एक वर्ष पार पडलं त्यामुळे मला विश्वास आहे कि पुढील ४ वर्षेही नक्कीच आम्ही पार करू असे भाकीत उद्धव ठाकरे यांनी केले.

मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही
ज्या प्रकारे आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिला आहे. शिवसेनेवर शाब्दिक हल्ले करणाऱ्या आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासावरही त्यांनी भाष्य केलं आहे. हिंदुत्त्ववादी म्हंटल कि एक संस्कृती आली. तुम्ही कुटुंबावर, मुलाबाळांवर येणार असला तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदुळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्हाला चांगलेच माहित आहे. ती शिजवू अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.

तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. तुम्ही जर सीबीआयचं दुरुपयोग करायला लागला तर वेसण घालवीत लागणार. ईडी काय, सीबीआय काय त्यावर अधिकार नाही? असा सवाल उपस्थित करत आम्ही नाव देतो. आमच्याकडे आहेत नाव मालमसाला पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेनं काय अपेक्षा ठेवायच्या. सुदानच जायचं असेल तर त्याचीही आमची तयारी आहे. तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना भरला आहे.

… जर मी मागे लागलो तर…
संजय राऊत यांनी दूसरा प्रोमोही पोस्ट केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे. मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार…आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ज्यांना ज्यांना मुलबाळं आहेत, त्यांनी आरशात बघावं, तुम्हालाही मुलबाळं आहेत, तुम्हालाही कुटुंब आहेत, तुम्हीही धुतल्या तांदळासारखे नाही, जर मी मागे लागलो तर मग…अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

वीजबिल प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता
वाढीव वीजबिलावरून गेल्या काही दिवसापासून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीजबिलाच्या मुद्द्यावर राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढले. एकूणच राज्यात वीजबिलावरून रणकंदन माजलं आहे. यासंदर्भातही संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे मुलाखतीत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

पहिल्या प्रोमोमध्ये काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अभिनंदन मुलाखतीचा ४४ सेकंदाचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे.

प्रोमोत मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ”ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन” हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले तरी मागे न हटता आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा दिला होता.

चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
दसरा मेळाव्यात जस भाषण झालं अगदी तसच उद्धव ठाकरे यांच भाषण झालं. शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्र्यांना न शोभणारी आहे. जनतेलाही हे योग्य नाही कळतं, आडवं-तिडवं करायचं असेल तर बोलता कशाला? गरजेल तो पडेल काय? त्यामुळे जे काही त्यांना वाटतं करावं ते करून टाकावं असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.

रोड छाप भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का?
बायका, मुलं आम्हाला पण आहे, म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये, राज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी, दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा भाजपाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे

You might also like