…म्हणून सायंकाळनंतर केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   एखाद्याने आत्महत्या केली असेल, अपघातात मृत्यू झाला असेल किंवा हत्या झाली असेल तर त्याचे पोस्टमार्टम केले जाते. पण मृतदेहाचे पोस्टमार्टम सायंकाळनंतर केल जात नाही. कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण करता येत नाही. कारण त्यावर कोर्टात अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. असे काही होऊ नये किंवा रिपोर्टमध्ये काहीच चूक राहू नये, म्हणून हे केले जाते.

शवविच्छेदन म्हणजे एक प्रकारे ऑपरेशनच असते. याद्वारे मृतदेहाचे परीक्षण केल जाते. पोस्टमार्टम करून हे जाणून घेतले जाते की, व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला. रिपोर्टनुसार,एखाद्याचा मृत्यू झाला तर 6 ते 10 तासांच्या आत पोस्टमार्टम करणे गरजेचे आहे. कारण उशीर झाला तर मृतदेहांमध्ये नैसर्गिक बदल होतात. तसेच सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केले जात नाही, कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण करता येत नाही. ट्यूबलाइट, एलईडी किंवा बल्बमध्ये जखमेचा रंग लालऐवजी जांभळा दिसतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये या रंगाच्या जखमेचा काहीच उल्लेख नाही, असे मानले जात आहे की, जर जखमेचा रंग लालऐवजी अन्य कोणता दिसत असल्यास त्या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकतो. त्यामुळे कधीही सायंकाळनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात नाही.