…म्हणून 350 कोटी रुपये पोत्यात भरुन अजित पवारांच्या टेबलवर टेकवा – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रभाव अधिक वाढत असल्याने अनेक सेवांचा अभाव दिऊन येत आहे. रुग्णाची सतत वाढणारी संख्या यामुळे ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिविर इंजेक्शन या गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून बोलताना पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, या सेवांच्या नियंत्रणाचे आणि पुरवठ्याबाबत हक्क मर्यादीत असल्याने त्या पुरवण्याची तयारी असली तरी नियमांमुळे त्या नागरिकांना पुरवता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी पाटील हे माध्यमाशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील माध्यमाशी बोलत होते त्यावेळी पुणे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते. पुणे मनपाने रेमडेसिविर इंजेक्शन घ्यायचं ठरवलं होतं याबाबत पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न केल्यावर त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेला वितरकांकडून किंवा कंपन्यांकडून इंजेक्शन मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वीच याबाबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी ज्या दिवशी मी अजित पवारांबद्दल बोललो त्या दिवशी हाच मुद्दा होता. मी त्यांना म्हटलं की, ३५० कोटी पोत्यात भरुन अजित पवारांच्या समोर टेकवा आणि म्हणा की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, तुम्ही इंजेक्शन आणि ऑक्सिजन द्या, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, १ कोटींच्या कंत्राटासाठी निविदा मनपाने काढली होती, पण त्याला कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. १ कोटींची इंजेक्शनबाबत टेंडर कोट करण्यात आलं होतं. परंतु, त्याला कोणाचाही प्रतिसाद आला नाही. कंपन्या आणि वितरकांकडे इंजेक्शन उपलब्धच नसल्याने असं झालं. कोणीही खात्रीशीर पद्धतीने सांगू शकत नव्हतं की आम्ही उपलब्ध करुन देऊ. सगळा कंट्रोल आता FDA कडे आहे. आम्ही अगाऊ पैसे देऊन इंजेक्शन घ्यायला तयार आहोत. महापौर निधीमधील अगाऊ पैसे द्यायलाही तयार आहोत. आम्ही कुठल्या पद्धतीने मागे नाहीत. केवळ उपलब्ध करुन द्यायची जबाबदारी राज्य शासनाची आहे. तसेच यावरून पाटील म्हणाले, माझ्याकडून एक घोषणा करु इच्छितो की, जो वितरक आधी पैसे मागतोय त्याला मी अगदी भीक मागून देईन. असे त्यांनी म्हटलं.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, मनपाने त्या वितरकाला पैसे दिले की त्यांनी माझे पैसे मला परत करावेत. मी शंभर कोटींचे अगाऊ पेमेंट वितरकाला देईल. वितरांनी आधीच्या अनुभवावरुन असा नियम केलाय की आधी पैसे घ्यायचे. आधी पैसे घेतले नाही तर मिळत नाहीत, असा त्यांना अनुभव आहे, या दरम्यान, राज्यात कुठेही इंजेक्शनसाठी वितरकांना पैसे अगाऊ हवे असतील तर माझ्याकडून घ्यावेत त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळाले पैसे की माझे पैसे परत करावेत, असेही ते म्हणाले आहेत.