चिखलीतील रासायनिक पावडर असलेल्या गोडावूनला ठोकले टाळे; मालकावर FIR दाखल, महापालिकेची कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिखली स्पाईन रोड, नक्षत्र सोसायटी शेजारी एका गोडावूनमध्ये रासायनिक पॉवडरची (chemical powder) पोती टाकली जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महापालिका पर्यावरण विभागाच्या पथकाने संबधित ठिकाणी धाड टाकत गोडावून सील करून मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

चिखलीतील स्पाईन रस्त्यावरील नक्षत्र सोसायटी शेजारील एका गोडावूनमध्ये रासायनिक पावडरची chemical powder पोती पडलेली आहेत. तसेच परिसरातही अनेक पोती आहेत. त्यावर पाणी पडले की त्यातून धूर येतो. हा धूर शेजारी असणाऱ्या सोसायट्यामध्ये जात आहे. हा उग्र वास असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. ही पोती कोणत्या पॉवरडरची आहेत याची माहिती पर्यावरण विभागाला मिळू शकली नाही. याबाबत महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी धाव घेत गोडावूनला टाळे टोकले आहे. याबाबत पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, एका गोडावूनमध्ये रासायनीक पावडरची chemical powder पोती असून त्यामुळे दुर्गंधी येत आहे. अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानुसार पाहणी केली असता, पोत्यांवर पाणी पडले की धूर निघत होता. ही पॉवडर रासायनिक असावीत, असे जाणवल्याने गोडावून सील करून प्रदूषण नियंत्रण मंडळास कळविले असल्याचे सांगितले.

Also Read This : 

Coronavirus in Pune : पुण्यात 50 दिवसांमध्ये 53 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

 

Wab Title : so seal sweetness mud containing chemical powder pimpari chinchwad