…म्हणून शिवसेना भाजपाचे संबंध तुटत नाहीत

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – पुन्हा एकदा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा-शिवसेना यांच्या युतीवर निशाणा साधला आहे. जसे प्रियकर प्रियसीचे संबंध तुटत नाहीत, त्याप्रमाणे भाजपा-शिवसेनेचे संबंध तुटत नाहीत. अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आगमी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जिल्हादौरा सुरु केला आहे. दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्याचा दौरा सुरु केला आहे. दरम्यान अहमदनगरमधील शिर्डी येथे माध्यमांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा-शिवसेना यांच्या युतीवर निशाणा साधला, दरम्यान, भाजपा हा शिवसेनेचा प्रियकर आहे आणि शिवसेना ही भाजपाची प्रेयसी आहे.

जसे प्रियकर प्रियसीचे संबंध तुटत नाहीत, त्याप्रमाणे भाजपा-शिवसेनेचे संबंध तुटत नाहीत. ज्या प्रमाणे प्रेयसीचे भांडण हे कधी चांगल तर कधी बिघडलेले असते. त्याप्रमाणे प्रेयसीचे ( शिवसेनेचे ) भांडण हे कधी चांगल तर कधी बिघडलेले असते. त्यामुळे भाजपा-शिवसेनेची युती होईलच. मात्र सेना-भाजपाची युती झाल्यास फायदा आम्हालाच होईल. असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.