‘या’ कारणामुळं शिवसेनेच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात ‘हे’ शेतकरी ‘दाम्पत्य’ स्टेजवर असणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला स्टेजसमोर बसण्याची परवानगी द्या, अशी विनंती शेतकरी संजय सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुमचा फोन नंबर द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजसमोर नाही तर स्टेजवर बसवेल, असे आश्वासन संजय सावंत यांना दिले.

शिवसेनाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्य पाच दिवस निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अणवाणी पायाने पत्नीसह विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला गेले होते. संजय सावंत आणि रुपाली सावंत असे शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. सावंत यांनी उद्धव ठाकरेंना पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तिर्थ भेट दिले. उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यात जत येथील संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याचे आभार मानले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. सांगलीमध्ये फळबागायतदारांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिंकाचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांना धीर दिला. विट्यातील कराड रस्त्यालगतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांनी सावंत यांची भेट घेतली व शपथ घेताना आम्हाला एका कोपऱ्यात उभारण्याची संधी द्यावी, अशी इच्छा दाम्पत्याने व्यक्त केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like