…म्हणून अभिनेत्रीनं कापले केस, ‘हैराण’ होऊन सेलेब्स म्हणाले – ‘हे काय केलंस तापसी ?’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार तापसी पन्नू सध्या चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. याचे कराण तिचा एखादा सिनेमा किंवा तिनं केलेलं वक्तव्य नाही तर तिची हेअर स्टाईल आहे. सध्या आपल्या हेअर स्टाईलनं तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तापसनीनं तिचे केस कापले आहेत. शॉर्ट लेंथ असेलल्या या नव्या हेअरकटचा फोटो तापसीनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इंस्टावरून फोटो शेअर करताना तापसीनं लिहिलं की, “आणि माझा प्रयोग सुरूच आहे. कारण माझ्या केसांना कलरींग हँडल करायलाच जमलं नाही. म्हणून मी माझी केसंच कापली. असं ऐकलंय की लोक आपल्या केसांसोबत खूपच अॅटॅच होतात. मला असं वाटतं की, ही घरची शेती आहे. मला माझ्या पंजाबी रक्तावर पूर्ण भरोसा आहे.”

तापसीचा हा हेअरकट पाहून तिचे चाहते आणि स्टार्सही चकित झाले आहेत. भूमी पेडणेकरनं तिच्या फोटोवर कमेंट केली की, एक सेकंद हा थ्रोबॅक फोटो आहे की, तू खरंच केस कापलेत.” थप्पड सिनेमाचे डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनीही कमेंट करत विचारलं, हे काय केलंस?

https://www.instagram.com/p/B-eE-ptBPpp/

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/B98Ye3mJnCe/

https://www.instagram.com/p/B9Jw2knHbDY/

https://www.instagram.com/p/B78lLLhJg0k/

https://www.instagram.com/p/B2V6iEXh_Na/

https://www.instagram.com/p/BdMbMhPjxkH/

https://www.instagram.com/p/BdIxa-DD-A0/