… म्हणून आघाडीचे मित्रपक्ष ‘समर्थन’ देण्यास तयार, जयंत पाटलांनी सांगितलं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी आता सत्तास्थापनेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची आघाडीतील मित्र पक्षांशी बैठक पार पडली. यानंतर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की सर्व मित्र पक्षांनी दोन्ही काँग्रेसच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यामुळे आता सर्वांची सहमती मिळाल्याने सर्वांना विश्वासात घेऊन शिवसेनेशी चर्चा करु. जयंत पाटलांनी दिलेल्या वक्तव्यामुळे आता सत्तास्थापनेला वेग आला आहे.

जयंत पाटील म्हणाले की भाजप सोडून राज्यात सरकार स्थापन व्हावं या भूमिकेला मित्रपक्षांनी समर्थन दिले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना मित्र पक्षांनी समर्थन दिले आहे. आता सत्तास्थापनेचा दावा शिवसेनेशी चर्चा करुन करु. मित्र पक्षांनी दोन्ही काँग्रेसच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर मित्र पक्षांची चर्चा झाली असल्याचे देखील जयंत पाटलांनी सांगितले.

भाजपला कुमकुवत करण्याच्या दृष्टीने योग्य –
भाजप शिवसेना युतीत लढल्या, युतीला जनतेचा कौल देखील मिळाला. परंतू त्यांना सरकार बनवता आले नाही, अशावेळी भाजपला कुमकुवत करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल असे मत सपा नेते अबू आझमी यांनी मांडले.

Visit : Policenama.com